पिक विमा योजना 2024 / Pik vima yojna 2024

  पिक विमा योजना 2024

पिक विमा योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या विमा योजनेविषयी सविस्तर माहिती व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

पिक विमा योजना 2024

शेतकऱ्याचे एक अर्जासाठी भरावा लागेल फक्त एक रुपया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीर केले की शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याची गरज राहणार नाही ह्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. फक्त एक रुपया मध्ये शेतकऱ्यांना पिकाचा पिक विमा काढता येणार आहे अशी त्यांनी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे .

राज्य सरकारच्या धोरणानुसार आता खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 25 ते 26 अशा तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांना फक्त केवळ एक रुपया मध्ये पिक विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याचा जीआर राज्य सरकारने दिनांक 26 जून 2023 रोजी जाहीर केला आहे.

शेतकऱ्यांना जरी एक रुपयात पिक विमा काढता आला तरी त्याची उर्वरित रक्कम राज्य शासन विमा कंपनीला अदा करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन त्यांच्या पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे म्हणजेच पिक विमा संदर्भात शासन शेतकऱ्यांचा अधिकचा भार उचलून शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा लाभ देणार आहे .

पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारीख ही 31 जुलै 2024 आहे याची देखील नोंद शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे .

पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार असून प्रत्येक वर्षी शेतकऱ्याची होणारी पिकाची नुकसान व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे.

प्रत्येक वर्षी आपल्या भारत देशामध्ये कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ तर कधी कीटकनाशके, गारपीट यामुळे शेतकऱ्याचे पिकाचे मोठे नुकसान होत असे ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अमलात आणली व त्याचे पैसे देखील राज्य सरकार भरणार असून शेतकऱ्याचा सर्व आर्थिक भार राज्य सरकार उचलत असल्याकारणाने प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळणे शक्य झाले आहे.

पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील 14 पिकांसाठी लाभ घेता येणे शक्य आहे ते खालील प्रमाणे

ज्वारी , बाजरी

नाचणी, भात

सोयाबीन , कापूस

भुईमूग , उडीद

मका ,तूर

खरीप कांदा, नाचणी

कारळे,तीळ

अशा एकूण 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे .

पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

सातबारा उतारा

आठ अ उतारा

बँक पासबुक

आधार कार्ड

पॅन कार्ड

मोबाईल नंबर

स्वयंघोषणापत्र

वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यकता असते.

पिक विमा योजनेचा होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे याची देखील नोंद शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.

अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या.

http://www.newsjunner.com


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

महात्मा फुले जन आरोग्य योजना