मिनी डाळ मिल योजना 2023 mini dal mil yojna लाभार्थ्यांना मिळणारं 1 लाख 50 हजार रुपये अनुदान
मिनी डाळ मिल योजना 2023 Mini dal mil yojna डाळ मिल योजना 2023 नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण डाळ मिल योजनेविषयी असणारी माहिती पाहणार आहोत व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे, लाभार्थीचे वय व त्यासाठी असणारे अटी याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे मिनी डाळ मिल योजना आहे . मिनी डाळ मिल योजनेसाठी लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे . मिनी डाळ मिल योजनेसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, दीड लाख रुपयाचे अनुदान डाळ मिल खरेदी करण्यासाठी मिळते तर इतर लाभार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये इतके अनुदान मिळते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी , महिला यांना 60 टक्के अनुदान देण्यात येते तर इतर लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते. मिनी डाळ मिल योजना मिनी डाळ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व विशेष करून महिला वर्गाला शेती करत असताना शेतीबरोबरच डाळ मिल योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करून