Posts

Showing posts with the label P m yojna

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना p m yojna

 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2023  P m jivan jyoti vima yojna  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लाभार्थ्याची वय पात्रता त्याच्या अटी व या योजनेचे सर्व निकष आपण या लेखात पाहणार आहोत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने जीवन ज्योती विमा योजनेची स्थापना केली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी गरीब लोकांसाठी ज्यांचे हातावर पोट आहे त्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला आपल्या सरकारी बँकेमध्ये 330 रुपये भरून दोन लाख रुपये जीवन ज्योती विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वय 18 ते 55 इतकी असावे. जर जर लाभार्थ्याचा अपघाताने अथवा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या वारसास जीवन ज्योती विमा संरक्षण म्हणून दोन लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने बँकेत आपले जीवन ज्योती विमा पॉलिसी साठी

महिलांना मिळणार आता गॅस कनेक्शन मोफत प्रधानमंत्री उज्वला योजना p m ujwala yojna

 प्रधानमंत्री उज्वला योजना  p m ujwala yojna प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभ उद्दिष्टे व फायदे उज्वला योजनेचा लाभ कसा मिळू शकतो प्रधानमंत्री उज्वला योजनेची माहिती खालील प्रमाणे प्रधानमंत्री उज्वला योजनेची स्थापना केंद्र सरकारने 2016 रोजी केली आहे .  केंद्र सरकार आर्थिक दृष्ट्या कुमकुवत व दारिद्र्यरेषेच्या खाली जीवन जगणाऱ्या सर्व कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन देणार आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून आता सर्व दारिद्र्यरेषेतील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन असल्यामुळे पारंपारिक पद्धतीने भोजन तयार करण्यासाठी महिलांना होणाऱ्या त्रासांपासून मुक्तता मिळणार आहे त्यामुळे महिलांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ह्या योजनेची स्थापना झाली त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होणार आहे . पारंपरिक पद्धतीमुळे महिला भोजन तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करत होत्या आता तो वापर टाळणे शक्य झाली आहे यामुळे वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल टाळण्यात मदत होणार आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून आता कुटुंब सुखी आणि समृद्ध होणार आहे . या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या जवळजवळ पाच