पीएम किसान योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना 2o22-2023 आता 1 रुपयात मिळणार शेतकर्यांना पीक विमा
पिक विमा योजना 2023 पिक विमा योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या विमा योजनेविषयी सविस्तर माहिती व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. पिक विमा योजना 2023 शेतकऱ्याचे एक अर्जासाठी भरावा लागेल फक्त एक रुपया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीर केले की शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याची गरज राहणार नाही ह्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. फक्त एक रुपया मध्ये शेतकऱ्यांना पिकाचा पिक विमा काढता येणार आहे अशी त्यांनी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे . राज्य सरकारच्या धोरणानुसार आता खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 25 ते 26 अशा तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांना फक्त केवळ एक रुपया मध्ये पिक विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याचा जीआर राज्य सरकारने दिनांक 26 जून 2023 रोजी जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना जरी एक रुपयात पिक विमा काढता आला तरी त्याची उर्वरित रक्कम राज्य शासन विमा कंपनीला अदा करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन त्यांच्या पिकांना विमा संरक्षण मिळणा