वन्य प्राणी / जंगली प्राणी हल्ला नुकसान भरपाई
वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या मनुष्य हानीसाठी नुकसान भरपाई म्हणून जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. शेतकरी हा शेतीमध्ये शेती करत असताना बराच वेळा जंगली प्राण्यांमुळे त्याच्यावर हल्ला झालेला अथवा मृत झालेला आपण वारंवार बातमी द्वारे पाहत असतो व त्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर खूप मोठे आर्थिक नुकसान व कुटुंबाचा प्रमुख गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येते त्यामुळे गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदन म्हणून शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे कुटुंबाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये बिबट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तसेच वाघ, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस , कोल्हा, मगर, हत्ती, रान कुत्रे, माकड यांचे देखील मनुष्य वस्तीमध्ये वावर वाढल्यामुळे मनुष्यावर हल्ले झालेले आपण पाहिलेले आहे . जंगली वन्य प्राण्यांमुळे केलेल्या हल्ल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या पाळीव प्राण्याच