Lek ladki yojna 2023 / लेक लाडकी योजना 2023
लेक लाडकी योजना लेक लाडकी योजना 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये लेक लाडकी योजनेविषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारने मुलगी जन्मल्यानंतर एक लाख एक हजार रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली आहे त्यामुळे आता मुलगी जन्माला नंतर त्या कुटुंबाला मुलींच्या भवितव्याची चिंता राहणार नाही . ह्या योजनेचे नाव लेक लाडकी योजना या नावाने शासनातर्फे मंजुरी देण्यात आली आहे . लेक लाडकी योजनेची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी सांगताना दिली व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा ही या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे . महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या किंवा ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 2023 च्या मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली याची बैठक झाली व त्याची तूर्तास मंजुरीही देण्यात आली आहे त्यामुळे या