Posts

Showing posts with the label Mulching paper anudan

मल्चिंग पेपर अनुदान योजना 2023, शेतकर्‍यांना मिळणारं 50 % अनुदान

 प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना 2023 मल्चिंग पेपर अनुदान नमस्कार मित्रांनो आज आपण मल्चिंग पेपर अनुदान योजनेविषयी असणारी माहिती व त्या संबंधित असणारे सर्व कागदपत्रे याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेखामध्ये पाहणार आहोत. आज आपल्या देशामध्ये शेती करत असताना बराच आमुलाग्र बदल झालेला पहावयास मिळतो त्यामुळे शेतकरी ही पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसावयास मिळत आहे व त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेती उत्पादनामध्ये वाढ झाल्याचा दिसून येतो व त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढून शेतकरी सुखी व समृद्धी होण्यास मोठी मदत मिळत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांची शेती उत्पादन वाढवण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या उपायोजना राबवत असते त्यातीलच एक उपाय योजना म्हणजे शेतीसाठी लागणारी मल्चिंग पेपर अनुदान योजना होय . मल्चिंग पेपर मुळे शेतीसाठी कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याचे दिसवायास मिळते . शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांना ऐवजी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो