Posts

Showing posts from November, 2023

आयुष्यमान भारत योजना / aayushyman bharat yojna

  आयुष्यमान भारत  योजना 2023 आयुष्यमान भारत योजना / महात्मा फुले जन आरोग्य योजना  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आयुष्यमान भारत योजना अथवा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेविषयी सर्व माहिती व त्या संबंधित असणारे सर्व कागदपत्रे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत . महाराष्ट्र सरकारचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दिनांक 2 जुलै 2012 पासून महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये आयुष्य भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित योजनेची दिनांक 1 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे 1 सध्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत     आरोग्य  संरक्षण प्रती कुटुंब प्रति वर्ष रुपये 5 लक्ष एवढे