Posts

Showing posts from April, 2023

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

शेतीसाठी विहीर अनुदान योजना  Viheer yojna  ह्या योजनेसाठी शासनाकडून  मिळवा 4 लाख रुपये अनुदान  राज्यातील बरेचसे शेतकरी हे पैश्याच्या अभावी आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी व पाण्याची सुविधा करण्यासाठी असमर्थ आहेत ह्या योजनेच्या माध्यमातून जर शेतात विहीर झाली तर  शेतकरी शेतीला पुरेसे पाणी देवू शकतो व आर्थिक दृष्ट्या संपन्न होवू शकतो . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून शासन शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान देत जाणार आहे. भूजलाच्या सर्वेनुसार  राज्यात अजून 4 लाख विहीर खोदणे शक्य आहे. ह्या विहिरी लवकरात लवकर खोदल्यास आपला शेतकरी राजा सुखी व आनंदी,समाधानी होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. शेतकरी वर्गाचे दारिद्र्य घालवण्यासाठी व मागेल त्याला विहीर  ( निकषानुसार ) ह्यासाठी ह्या  योजनेचा  शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. # लाभधारकाची निवड  या याजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. 1.अनुसूचित जाती 2.अनुसूचित जमाती 3.भटक्या जमाती

मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना 2.0

Image
  शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना 2.0 चा शुभारंभ  Translate to English Hindi Tamil Telugu Gujarati Marathi Bengali Kannada Malayalam Sindhi Assamese Urdu Sanskrit Punjabi Odia Konkani Dongri Bodo Manipuri Nepali Santali Maithili Kashmiri मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना 2.0 ह्या अभियानाचा शुभारंभ अथवा उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होवा हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे . रात्री अपरात्री विजेचे नियोजन नसल्याने आपल्या शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे . जंगली जनावरे त्यात प्रामुख्याने बिबट्याचा हल्ली खूप त्रास वाढला आहे , ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यावर सरकारने असे ठरविले की  सौर ऊर्जेचा जर वापर केला तर शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा करता येईल ह्या उद्देशानेच राज्य सरकारने कृषी सौर वाहिनी योजना स्थापन केली. तसे पाहिले तर मानवाच्या अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा असल्या तरी  याचबरोबर सध्या डिजिटल दुनियेत  उर्जेची गरजही आता वाढली आहे. भारतात तसे  पारंपरिक ऊर्जास्त्रोत मो

अटल पेन्शन योजना - सरकारी पेन्शन योजना

 भारत सरकार अटल पेन्शन योजना  महिन्याला  फक्त 210 रुपये जमा केल्यावर  मिळवा  60,000 रुपये पगार वर्षाला  अटल पेन्शन योजनेत तुम्हाला कमीत कमी  20 वर्षे पैसे जमा करण्याचा  नियम आहे .व्यक्तीने वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला  पेन्शन मिळू शकते  अटल पेन्शन योजना   प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही भारतात कमी कालावधीत प्रसिद्ध झालेली योजना आहे .  ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमची आर्थिक बचत  करुन  उतार वयात महिन्याचा औषधांचा खर्च व तुम्हाला लागणारा खर्च भागविता येवू शकतो तुम्हाला कोणावरही अवलंबून रहायची गरज लागणार नाही . तुम्ही ह्या योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर होवू शकता . लवकरात लवकर  या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर योजनेतंर्गत तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. ही योजना सर्व सरकारी   बँक (Bank) अथवा पोस्ट कार्यालयातही (Post Office) उपलब्ध असून तुम्ही ऑफिस मध्ये जावून संपूर्ण माहिती घेवू शकता .. .  भविष्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर अटल पेन्शन योजना हा सर्वात उत्तम व चांगला पर्याय ठरू शकतो. अटल पेन्शन योजनेत जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक केली तर व्यक्तीच्या 60 व्या वर्षा

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

अपंग / दिव्यांग घरकुल योजना - त्याची माहिती  दिव्यांगांचे जीवनमान उंचवण्यासाठी व त्यांना घरकुल मिळावे म्हणून शासनाकडे विविध संगठना मागणी करत असतात त्यामुळे शासनाने अर्थसंकल्प 2023 मध्ये 100 कोटींची तरतूद अपंगांसाठी केली आहे . राज्यात जवळ जवळ 30 लाख अपंग असून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अपंगांसाठी 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना घरकुल मिळावे अशी मागणी देखील केली ... अपंग घरकुल योजना महाराष्ट्र राज्य  ही योजना राज्य  सरकार ची योजना आहे दिव्यांग योजना  चा उद्देश दिव्यांग मागासवर्गीयांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे. कधी सुरु झाली 27 फेब्रुवारी 2019                     पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कळविण्यात जो कोणी अपंग असेल व त्याच्याकडे 40 टक्के अपंग असलेला ऑनलाईन दाखला असेल तर त्याने ग्रामपंचायत मध्ये जावून आपला घरकुल चा फॉर्म भरून आपली कागदपत्रे तेथे जमा करावी ती कागदपत्रे ग्रामसेवक अथवा सरपंच तत्काळ मंजुरीसाठी पंचायत समितीला पाठवून देतात .दर  वर्षासाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत निधीतून यशवंत अपंग घरकुल योजना मंजुरी देण्यात येत असते .ज्या लाभार्थ्यांना पक्के घर न

सुकन्या समृद्धी योजना - बेटी बचाव बेटी पढाओ

सुकन्या समृद्धी योजना व त्याची उद्दिष्टे. मुलींचे भविष्य पाहता सरकारने सुकन्या समृद्धी योजना अमलात आणली ,कारण ह्या 10 वर्षाच्या आतल्या कालखंडात स्त्री भ्रूण हत्यांचे प्रमाण खूप वाढले होते ,मुलगी जन्माला आली की पालकांना ती खूप मोठी जबाबदारी वाटते त्यामुळे समाजात मुलीचे प्रमाण खूप कमी होत चालले होते ह्या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व स्त्रीभ्रूण हत्या होवू नये म्हणून सरकारने सुकन्या समृद्धी योजनेची स्थापना केली....  सुकन्या समृद्धी योजना काय आहे व त्याचे काय फायदे आहेत ह्याची आपण  सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारत सरकार अश्या अनेक योजना चालवत आहे ज्याद्वारे मुलींचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. त्यामधील अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना.  सुकन्या समृद्धि  योजनेची उद्दिष्ट्ये.. भारताचे लाडके पंतप्रधान यांनी सुकन्या समृध्दी योजना ही मुलींचे उज्वल भवितव्य व्हावे यासाठी २२ जानेवारी २०१५ रोजी ह्या योजनेची  स्थापना केली ..  या योजनेंतर्गत पालकांनी आपल्या मुलीचे  बचत खाते  राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात उघडले पाहिजे . ज्या  पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि किंवा लग्न

संजय गांधी निराधार योजना.....

संजय गांधी निराधार अनुदान योजना  क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेसाठी लाभार्थी खालीलप्रमाणे  या योजनेसाठी  60 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला       ( ज्यांना मुल बाळ सांभाळणारे नाही असे ), निराधार महिला  अनाथ मुले  अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), विधवा महिला ज्यांची मुले 18 वर्षा खालील पाहिजे ,घटस्फोट  झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, असे अनेक नियम ह्या योजनेत समाविष्ट आहे.  संजय गांधी निराधार योजनेसाठी  दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालयात संपर्क करून माहिती घेवू शकता ,जर तलाठी activ असेल ,सरपंच activ अस

ई श्रम कार्ड योजना - असंघटित कामगार योजना

 ई श्रम कार्ड योजना - असंघटित कामगार योजना सरकार द्वारे ई-श्रम पोर्टल योजना ही कामगारांसाठी 26 ऑगस्ट 2022 रोजी सुरू करण्यात आले आणि याद्वारे सरकार कामगारांना ई-श्रम कार्ड देखील प्रदान करते.त्यासाठी  आवश्यक  कामगारांसाठी असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे  1   आधार कार्ड  2    प्यान कार्ड  3    आधार लिंक केलेला मोबाइल क्रमांक  4    बँक खाते पुस्तक  इ श्रम कार्ड योजना  कर्मचार्‍यांसाठी ( पेन्शन योजना )भारत सरकारने त्यांच्या वृद्धावस्थेत सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केली आहे...   इ श्रम कार्ड धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास रु. 2 लाख, आणि  अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये भेटणार . ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला 500 रु.शासनाकडून दिले जाणार... ई-श्रम कार्डधारकांना सरकार 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार असून त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे वेगळे प्रीमियम भरण्याची गरज नसणार आहे  या अंतर्गत ई-श्रम कार्ड धारक अपंग झाल्यास. त्याला एक लाख रुपये मिळतात.  ई-श्रम कार्डधारकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यास  त्याला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. हे विमा संरक्षण त्यांना पंतप्रधान सुरक्षा

पंचायत समिती योजना 2023

पंचायत समिती योजना 2023 योजना फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती जुन्नर .अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधावा.. अ) महिला व बालकल्याण योजना खालीलप्रमाणे. ================ 1   ग्रामीण भागातील १८ वर्षे पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळणेसाठी अनुदान (रु.३०००/-)  2  ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविणे*. 3  ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन  पुरविणे*. 4  इयत्ता.७ वी ते १२ वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे  MS-CIT पुर्ण करणाऱ्या मुलीना ३५००/- रु.लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल  ब ) समाजकल्याण विभाग योजना खालीलप्रमाणे ( *मागासवर्गीयांसाठी – जातीचा दाखला आवश्यक*) ==================  1  यशवंत घरकुल,बेघर व कच्चे घर असणाऱ्या लाभार्थींना (रु.१,००,०००/-तीन टप्यांमध्ये*).  2  पिको फॉल कम शिलाई मशिन पुरविणे*.  3  पीठ गिरणी पुरविणे*.  4  पशुपालकांना कोंबडी पिल्ले व खुराडा पुरविणे*.  5  मागासवर्गीय व्यक्ती बचत गटांना शेळी-मेंढी गट पुरविणे*. क) पशुसंवर्धन विभाग योजना खालीलप्रमाणे  1   पशुपालकांना एक सिंगल फेज २ HP कडबाकुट्टी इलेक्ट्रिक मोटार सह (अनुदा

उस्मानाबाद शेळी पालन ,त्यांचे आजार व माहिती ..

*उस्मानाबादी शेळी पालन सामान्य माहिती* हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात आढळते. हा मोठ्या आकाराचा प्राणी आहे. हा कोट रंगाच्या विविध प्रकारात आढळतो परंतु प्रामुख्याने तो काळ्या रंगात आढळतो आणि त्यावर पांढरे किंवा तपकिरी ठिपके आढळतात. ते मांस आणि दूध उत्पादन या दोन्ही उद्देशांसाठी वापरले जाते. प्रौढ नर शेळीचे वजन 34 किलो आणि प्रौढ मादी शेळीचे वजन 32 किलो असते. नर शेळीची शरीराची लांबी अंदाजे 68 सेमी आणि मादी शेळीची लांबी अंदाजे 66 सेमी असते. दररोज सरासरी दूध उत्पादन 0.5-1.5 किलो असते. उस्मानाबादी शेळीची उत्पत्ती महाराष्ट्रातील उस्मानाबाद आणि अहमद नगर जिल्ह्यात आहे. या जातीला उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव देण्यात आले आहे. ही महाराष्ट्रातील लोकप्रिय शेळी जातींपैकी एक आहे. ही दुहेरी-उद्देशीय शेळीची जात आहे जी दूध आणि मांस दोन्ही चांगल्या प्रमाणात उत्पादन करते. ही मोठ्या आकाराची शेळीची जात आहे जी प्रामुख्याने मुलांच्या अनेक जन्मांसाठी ओळखली जाते. ही शेळीची जात स्टॉल फीडिंग आणि व्यावसायिक शेळीपालनासाठी योग्य आहे. परंतु महाराष्ट्रात, हे प्रामुख्याने लहान शेतकरी अर्ध-गहन शेळीपालनात वापरले जाते.

केळी आरोग्यासाठी उपयुक्त ....१५ एप्रिल जागतिक केळे दिवस....

 *आज १५ एप्रिल* 🙏🙏🙏🙏 *आज जगभरात जागतिक केळे दिवस (वर्ल्ड बनाना डे) साजरा केला जात आहे* मंडळी, घरी केळी नसतील तर घेऊन या व आज भरपूर केळी खा. तसेच घरातील लहानग्यांनाही भरपूर केळी खायला द्या. आणि कोणाचा उपास असेल तर काहीच चिंता नाही केळी म्हणजे फळंच तर उपासाला चालतातच. जागतिक पातळीवर दरवर्षी आजचा दिवस केळे दिवस म्हणून साजरा केला जातो. निसर्गतःच केळ्यात अशी द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे मानसिक ताण, चिंता (Anxiety) कमी होण्यास खूप मदत होते. यामुळेच पूर्वीचे लोक परीक्षा किंवा मुलाखतीला (इंटरव्ह्यू) जाताना केळं अवश्य खात असत. केळ्याची शिकरण हा तर पूर्वी आपल्याकडे गोडधोडाचा पदार्थ मानला जायचा. कवीवर्य गदिमांचे गाणे आठवते? मामाची बायको सुगरण! रोज रोज पोळी शिकरण. मंडळी, शिकरण हा अस्सल मराठमोळा पदार्थ. आपणही आज केळ्याची शिकरण जरूर खा. आज केळ्यांचा भरपूर आनंद घ्या व लहानग्यांनाही मनसोक्त केळी खाऊ द्या. मुलांना तर शिकरण खूप आवडते. पोटभर खाऊ द्या त्यांना. केळे हे फळ १२ही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. तसेच कॆळं हे सर्वांना आवडणारे फळ आहे. कदाचित हत्तींचे सर्वात आवडतं फळ कॆळं असावे म्हणू

!!जय शिवराय !! जय भिमराय !!

 *!! शिवराय ते भिमराय !!* -------------------------------- *ज्यांच्या आयुष्याची सुरूवात आणि शेवट संघर्षाने झाला त्यांच्या कार्याने सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले,न्याय व हक्कांसाठी लढणं आणि शुन्यातुन घडण हे जनसामान्यांना ज्यांच्या प्रेरणेतुन मिळालं, जातीव्यवस्थेच्या अयायकारक भिंतींना भेदून सामान्यांच्या आयुष्यामध्ये विकासाचे किरण ज्यांच्या कार्यामुळे आले ते आपले सदोदित आदर्श युगपुरूष शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आनन्यसाधारण कार्याविषयी आजचा हा संयुक्तिक लेख ...!*                          🙏🙏🙏🙏🙏🙏     शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे,जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे भारतरत्न विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ज्यांनी लिखित केलेल्या संविधानावर आपला संपुर्ण भारत देश चालतो आणि हेच विचार त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरलेले श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र यांच मोल शब्दांत करणं शक्य नाही.एक युगपुरूष असा ज्याने तलवारीच्या आणि शिवनीतिच्या धारेने शत्रुला नामोहरण केले व सामान्य जनतेसाठी रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केल

हृदविकार व आयुर्वेदिक उपचार.....

             🙏हृदविकार व त्यावरील आयुर्वेदिक उपचार🙏                         🙏🙏🙏🙏🙏🙏  *3000 वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात खूप मोठे ऋषी होते.  *त्यांचे नाव होते* *महर्षि वाग्भट जी!!*  त्यांनी एक पुस्तक लिहिले  *ज्याचे नाव* *अष्टांग* *हृदयम्!!*  *(अस्तंग हृदयम्)*  *आणि या पुस्तकात त्यांनी * *7000* रोग बरे करण्याचे सूत्र लिहिले!  *हे त्यापैकी एक सूत्र आहे!!*  *वाग्भट जी लिहितात की हृदयाला कधी झटका येतो!* *म्हणजे हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज होऊ लागले आहे!*  *म्हणजे रक्तात आम्लता वाढली आहे!*  *अॅसिडिटी तुम्हाला समजते!*  *ज्याला इंग्रजीत acidity म्हणतात!!*  *आम्लता दोन प्रकारची असते!  *एक म्हणजे पोटाचा आंबटपणा!*  *आणि एक म्हणजे रक्ताची आम्लता!!*  *जेव्हा तुमच्या पोटात आम्लपित्त वाढेल!* *तेव्हा तुम्ही म्हणाल*  ✔️ *पोटात जळजळ होते!!*  ✔️*आंबट आंबट ढेकर येत आहेत!*  ✔️ *तोंडाला पाणी सुटले!*  *आणि ही आम्लता आणखी वाढली तर!*  *म्हणून हायपर अॅसिडिटी होईल!*  *आणि जेव्हा ही पोटाची आम्लता वाढून रक्तात जाते तेव्हा रक्ताची आम्लता होते!!*  *आणि जेव्हा रक्तात आम्लता वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त

बँक सेवा तक्रार ......

बँक च्या सेवे च्या बाबत तक्रार कोठे व कशी करावी.?            या जाणून घेवू याबाबत खालीलप्रमाणे. *१) बँकेत लेखी तक्रार दिली नसल्यास ती द्यावी, २) त्यानंतर संबंधित बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून तक्रार द्यावी, ३) बँकेच्या तक्रार निवारण कक्षाला email करावेत ४)RBI omubdsman ला तक्रार द्यावी व सोबतच आपल्या बँकेच्या MD अथवा CEO ना ई-मेल करा. आरबीआय बँकिंग लोकपालकडे थेट आरबीआय तक्रार दाखल करू शकता का? तुमच्या आरबीआयची तक्रार दाखल करण्यासाठी लोकपालाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला काही प्रक्रिया पाळाव्या लागतील. तुम्हाला आधी तुमच्या बँकेकडे हा मुद्दा उपस्थित करावा लागेल, ज्याला तुमची तक्रार 30 दिवसांच्या आत बंद करणे बंधनकारक आहे. जर बँक तुमच्या चिंता दूर करण्यात अपयशी ठरली किंवा तुम्ही कार्यवाहीच्या निकालावर समाधानी नसाल तर तुम्ही RBI लोकपालाकडे जाऊ शकता. आपण आरबीआय बँकिंग लोकपालाकडे जाण्यापूर्वी, हे देखील लक्षात घ्या की 'इतर कोणत्याही न्यायिक मंचात प्रलंबित तक्रारी बँकिंग लोकपालांकडून स्वीकारल्या जाणार नाहीत'.                      🙏🙏🙏🙏🙏🙏 आरबीआय तक्रार कोठे दाखल करायची? आपण दाखल कर

महात्मा ज्योतिबा फुले जयंती ११ एप्रिल

 *।। भारत माता कि जय ।।*               🙏🙏🙏🙏🙏🙏 *११ एप्रिल - दिन विशेष - महात्मा ज्योतिबा फुले जयंती.*               🙏🙏🙏🙏🙏🙏 *शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांना शत शत वंदन.*               🙏🙏🙏🙏🙏🙏 *महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे समानता - सत्यासाठी देह झिजवणारे बहुजनांचे उध्दारक, समाजाचे सत्यशोधक संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.* *खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले.*                🙏🙏🙏🙏🙏🙏 *भारतीय समाज रचनेचा कायापालट केले.* *अशा एक महान क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*                 🙏🙏🙏🙏🙏🙏

आयुष्याचा डाव आणि पत्त्यांचा डाव दोन्हीही सारखेच ......

                         🙏🙏🙏  पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ...*                🙏🙏🙏🙏🙏🙏  पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे  किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात.  *बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.       पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.                🙏🙏🙏🙏🙏🙏 *1)* 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे *2)* 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे. *3)* या सर्व पत्त्याची बेरीज 364 *4)* एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष. *5)* 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष. *6)* 52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे 12 महिने *7)* लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*                   🙏🙏🙏🙏🙏🙏 पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ *1)* दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश *2)* तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि  महेश *3)* चौकी म्हणजे चार वेद   (अथर्ववेद, साम

कांदा आरोग्यासाठी वरदान ..

 *कांदा  खाणे* ....आयुर्वेदिक उपचार 1) उत्तम आहार हाच उत्तम आरोग्याचा कानमंत्र आहे. आरोग्य नेहमी ठणठणीत ठेवायचे असल्यास कांद्याचे सेवन वाढवले पाहिजे.  2) उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. यामुळेच डॉक्टरही या दिवसांमध्ये भरपूर कांदा खाण्याचा सल्ला देतात.  3) उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही. तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते.  4) कांद्याच्या सेवनामुळे यौवन दुर्बलता दूर होण्यास मदत होते.  5) कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे. भरपूर प्रमाणात कांदा खाल्ल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी होते.  6) कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, खनिज, फॉस्फोरस, कॅलरी, लोह असते. तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरताही भरून काढते.  7) कच्चा कांद्यावर लिंबू पिळून सेवन केल्याने अपचनाची समस्या कमी होते.  8) सर्दी, कफ अथवा घशाच्या खवखवीवर कांदा रामबाण उपाय आहे.  9) कांद्याच्या रसात गुळ अथवा मध एकत्र करून पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.  10) डायबेटिसचा त्रास असेल तर आहारामध्ये कांद्याच

जमिनीत पाण्याची पातळी वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त झाडे

 झाडाची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहेत  1) *एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.* याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे.  2) *एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.* आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.        एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.        *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.*     आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'.  🌳🌴🪴🍀🌿🌱🌳 🙏🙏  *झाडाचे महत्व जाणाल तर तुमचं महत्व वाढेल.* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

आरोग्यासाठी उत्तम सूचना....

*पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना* 1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे. 2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे. 3. ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे. 4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे. 5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे. 5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे 6. रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस. 7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम) 8. 12.30 ला थोडे हलके जेवण. 9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे. 10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण. 11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे. 12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप. ★ *या खबरदारी घ्या...* *रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,  किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात.... म्हणजे शंभर पावले चालणे.... लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री.... * जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक

आता 5,00,000 रुपयांपर्यंत उपचार होणार मोफत ...

 *ब्रेकिंग न्यूज*.                                                                      *आता सर्वांना एक मोठा दिलासा.*                                                              *महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट* 🌹□ महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू... 🌹○सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार...  🌹□या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्या मधून मोफत मिळणार... 🌹 *युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या*  सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे... 🌹□महात्मा फुले जीवनदायी योजनेचा पुन्हा विस्तार केलेला आहे.सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे... 🌹○योजनेअंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन

श्री स्वामी समर्थ महाराज स्तोत्र

!ओम नमोजी श्री गुरूनाथा !भक्त वत्सल समर्था ! तव पदी ठेवुनी माथा ! स्तवितो ताता तुजलागी !१! तू नित्य निरंजन ! तुज म्हणती निर्गुण ! तूच जगाचे कारण ! अहंभावे प्रगटलासी!२! तुझी स्तुती करावया ! शक्ती नसे हरिहर ब्रम्हा ! परी अघटीत तुझी माया ! जी संशयभया निवारीत!३! मूळ मुळीचा आकारू ! तुज म्हणती श्रीगुरु ! सच्चीत शक्तीचा आधारु पुर्णाधारू ओमकारासी!४! ऐसा तू देवाधिदेव ! हे विश्व तुझेची लाघव ! इच्छेचे वैभव ! मूळब्रम्ही नटविल !५! ऐसा तू बा अपरंपारू! या  अनंत ब्रम्हाचा आधारु ! चराचरीचा आकारू ! पूर्णाधारू म्हणविले!६! ऐशा तुजप्रती ! स्तवावया अल्प माझी मती !तू जाणसी हे चित्ती ! विश्वव्यापक म्हणवूनी!७! तरी देवा मतिदान !देणे तुजचि कारण ! जरी करणे समाधान !तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले !८! अहा जी निर्गुना! विश्वव्यापक सगुणा! सत्य निराकार निरंजना! भक्तांकरणे प्रगटलासि!९! रूप पाहता मनोहर ! मूर्ती केवळ दिगंबर ! कोटी मदनतेज निर्धार ! ज्याच्या स्वरुपी नटले!१०! कर्ण कुंडलाकृती !वदन पाहता सुहास्य मूर्ती ! भ्रुकुटी पाहता मना वेधती! भक्त भाविकांचे!११! भोवयांचा  आकारू ! जेथे भुले धनुर्धरू! ऐसे रूप निर्धारु ! नाही न

☕सुखाचा चहा ☕

 . 🌹 *..!!!!!  सुखाचा चहा  !!!!..*  🌹  रस्त्यातच त्याला पावसानं गाठलं...  आधीच सकाळपासून वैतागलेला तो...  त्रागा करत त्यानं गाडी बाजूला घेतली...  रस्ता तसा रोजचा परिचयाचा  पण कधी थांबावं लागलं नव्हतं...  ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला...  _पत्र्याच्या शेड खाली छोटीशी चहाची टपरी होती..._ _तसंही आज सकाळच्या घटनेमुळं_ _चहा प्यायचा राहिला होता_ _आणि आता वातावरणही छान होतं..._ _आणि हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता....._         टपरीवर एक जोडपं आणि छोटं मूल होतं...   ते मुल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या  पाण्याखाली हात नाचवत होतं आणि  खळखळून हसत होतं...  मध्येच ओला हात आई बाबांवर झटकत होतं  आणि त्याचा हा खेळ ते दोघं हसून बघत होते.... त्यानं चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या  बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला...  एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला...  त्याचं त्यालाच छान वाटलं...  समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती  आणि त्यामागं उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर चिंब पावसात धूसर होऊन  मजा करत उभे असलेले दिसले. हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला... बायकोचाच!  त्यानं कट के

राज्यात पुन्हा पाऊसाची शक्यता ...पंजाबराव डख

 *दि. .6,7,8  एप्रील दरम्याण राज्यात पावसाचे अचुक निदान !*- पंजाब डख *विभाग अंदाज*👇   🔴 *पूर्व व प .विदर्भात 7,8,9 एप्रील दरम्याण पाउस शक्यता  आहे.* 🔴 *मराठवाड्यात 7 8,9 एप्रील दरम्यान तुरळक भागात पाउस आहेच.* 🔴  *पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 7 8,9 एप्रील दरम्याण पावसाची शक्यता आहेच .* 🔴  *उत्तर महाराष्ट्रात 7,8 दरम्याण ढगाळ वातावरण राहुण तुरळक ठिकाणी पाउस पडेल 11,12 एप्रील ला उत्तर महाराष्ट्रात पाउस थोडा जास्त पाउस राहील.* *पूर्व-सुचना* *राज्यात काही भागात दि .16,17,18,19 एप्रील दरम्याण परत पावसाची शक्यता .* 🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*  *नाव : पंजाब डख* *हवामान अभ्यासक* *मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*