श्रावण बाळ पेंशन योजना 2023 shravan bal penshan yojna
श्रावण बाळ पेंशन योजना 2023 श्रावण बाळ पेन्शन योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये श्रावण बाळ योजनेची माहिती पाहणार आहोत श्रावण बाळ योजनेसाठी आवश्यक असणारी लाभार्थीची पात्रता त्याची वय अटी व निकष याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 65 वर्षाच्या पुढील वृद्धांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने श्रावणबाळ पेन्शन योजना लागू केली आहे. 65 वर्षांपूर्वी वृद्धांना आर्थिक साह्य मिळावी व त्या वृद्धांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहू नये यासाठी सरकार यांना आर्थिक मदत करणार आहे म्हणूनच राज्य सरकारने श्रावण बाळ पेन्शन योजना लागू केली आहे. श्रावण बाळ पेन्शन योजनेचे अ आणि ब श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. दारिद्र्य रेषेखालील ज्यांची नाव आहे त्यांना अ श्रेणीमध्ये विभागणी केली आहे तर ज्यांचे दारिद्र्य रेषेखालील नाव नाही त्यांना ब श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. श्रावण बाळ योजनेचा लाभ हा ग्रामीण अथवा शहरी भागातील कोणताही वृद्ध व्यक्ती घेऊ शकतो . श्रावण बाळ पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा लागतो अन्यथा त्याचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. श्रावण बाळ पेन्...