पशुसंवर्धन योजना 2023 / शेतकरी योजना

 पशुसंवर्धन विभाग योजना 2023


महाराष्ट्र राज्य नेहमी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे योजना राबवत असते यातीलच एक योजना म्हणजे पशुसंवर्धन विभाग योजना होईल . शेती नेहमीच निसर्गावर अवलंबून असते परंतु अवकाळी पाऊस , गारपीट, दुष्काळ अशा अनेक गोष्टींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होतात . शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीबाह्य व्यवसाय म्हणून दूध , कुक्कुटपालन अशी व्यवसाय करून आपली आर्थिक उत्पन्न वाढवावे व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग योजना अमलात आणली.


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणजेच पशुपालकांसाठी स्वयंरोजगाराचे साधन निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने दूध उत्पादन वाढीसाठी लाभार्थ्यांना दोन संकरित देशी गाई, दोन दुधाळ म्हशींची गट वाटप करण्याचे ठरवले आहे याचा फायदा शेतकऱ्यांनी म्हणजेच लाभार्थ्यांनी जरूर घ्यावा.


सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी गटाच्या किमतीच्या 50% व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना , अपंगांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे .

लाभार्थ्यांना अनुक्रमे पाच ते दहा टक्के रक्कम एवढा निधी स्वतः उभारणे आवश्यक आहे तर उर्वरित रक्कम अनुक्रमे वीस ते चाळीस टक्के बँकेकडून कर्जरूपाने अथवा स्वतः उपलब्ध करणे आवश्यक आहे.


शेळी मेंढी पालन योजना

महाराष्ट्र राज्याच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांसाठी शेळी मेंढी पालन योजनेद्वारे दहा शेळ्या मेंढ्या व एक बोकड अथवा मेंढा यांचे गट वाटप करण्यात येणार आहे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी गट किमतीच्या 50% तर अनुसूचित जाती जमाती, अपंग या लाभार्थ्यांना प्रकल्प किमतीच्या 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे .

सर्वसाधारण प्रवर्गातील व अनुसूचित जाती, जमाती , संघ ह्या लाभार्थ्यांना अनुक्रमे पाच ते दहा टक्के एवढा निधी स्वतः उभारणे आवश्यक आहे तर उर्वरित रक्कम अनुक्रमे वीस ते चाळीस टक्के बँकेकडून कर्जरूपाने अथवा स्वतः उपलब्ध करणे आवश्यक आहे.


कुक्कुटपालन योजना

कुक्कुटपालन योजना खालील प्रमाणे

महाराष्ट्र राज्याच्या नवनवीन योजनेअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती ,उपयोजना आदिवासी क्षेत्र उपयोजना

अंतर्गत 1000 मांसल कुकट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कारण महाराष्ट्र राज्यात नव्हे तर भारतात कुक्कुट मांस उत्पादनास मोठा वाव आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कुक्कुटपालन उत्पादन करण्याचा व्यवसाय अद्यापही वाढलेला नाही त्या जिल्ह्यात

1000 कुक्कुट पक्षी व्यवसाय करण्यासाठी लाभार्थ्यांना कुक्कुटपक्षीगृह, विद्युतीकरण, पाण्याची भांडी वखाद्य या मूलभूत सुविधा उभारण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के व अनुसूचित जाती जमाती , अपंग ह्या लाभार्थ्यांना 75 टक्के अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा.


पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच गाई म्हशी, शेळी मेंढी , कुक्कुटपालन या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे हा अर्ज सादर पद्धतीने सादर करावा लागतो यासंदर्भात माहिती खालील आणि देण्यात आलेली आहे .

पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी खालील प्रमाणे दिलेल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे .

आधार कार्ड

मोबाईल नंबर आधारशि लिंक असलेला

रेशन कार्ड

सातबारा उतारा व आठ अ

अपंग असेल तर प्रमाणपत्र

अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र

अर्जदाराचा फोटो

बँक पासबुक

एवढ्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असते

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्राची संपर्क करावा .Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

महात्मा फुले जन आरोग्य योजना

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna