मत्स्य पालन व्यवसाय योजना / fish farming

 मच्छी पालन व्यवसाय योजना

मत्स्य पालन व्यवसायासाठी सरकार देत आहे 75 टक्के अनुदान

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखांमध्ये मत्स्य पालन व्यवसाय योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत .


भारतातील वाढती महागाई व बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने सरकार नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे मत्स्य पालन व्यवसाय योजना होय या योजनेद्वारे प्रत्येक जण पैसे कमवू शकतो व आपली बेरोजगारी दूर करू शकतो.


मत्स्यपालन योजनेसाठी लाभार्थ्यांनी जास्त पैसे न गुंतवणूक करता यातून जास्त उत्पन्न मिळवू शकतात विशेष म्हणजे मत्स्यपालन व्यवसायासाठी सरकार खूप मदत करणार आहे.


राज्य सरकारची मदत घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या जागेवरती मत्स्यपालन व्यवसाय करून लाखो रुपये कमवू शकता .


कोणताही व्यवसाय करत असताना त्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो व तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल परंतु याची अजिबात काळजी न करता तुम्ही केंद्रातर्फे नुकतेच मत्स्यपालन अनुदानाची योजना राबवली जात आहे त्याचा प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे.


शासनातर्फे कर्ज सुविधा उपलब्ध आहे

मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष म्हणजे केंद्र सरकार मार्फत 75 टक्के कर्ज उपलब्ध असणार आहे यासाठी लाभार्थ्यांनी डोंगर धबधब्याच्या काठी अथवा तुम्हाला हवे त्या ठिकाणी हा व्यवसाय करू शकता .

प्रत्येक जिल्हा प्रशासनाचा स्वतंत्र असा मत्स्यव्यवसाय विभाग आहे.


जिल्हा विभागामार्फतच आता मच्छी उत्पादकांना म्हणजेच लाभार्थ्यांना संपूर्ण मदत केली जाणार आहे याशिवाय मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण सुद्धा सुरू आहेत. शासनाची मदत घेऊन व आपले प्रशिक्षण पूर्ण करून उत्तम अशा तांत्रिक पद्धतीने हा व्यवसाय सुरू केल्यास लाभार्थी हा कमी कालावधीमध्ये नक्कीच लाख रुपये कमवू शकतो.


मत्स्यपालन व्यवसाय द्वारे आर्थिक सक्षमीकरण होऊन लाभार्थ्याची नक्कीच आर्थिक प्रगती होईल परंतु हा व्यवसाय करत असताना तांत्रिक पद्धतीने व छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन हा व्यवसाय करण्यावरती लाभार्थ्यांनी भर दिला पाहिजे ह्या व्यवसायाद्वारे लाभार्थी हा आर्थिक प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. दिवसेंदिवस भारतामध्ये माशांची खूप मोठी मागणी वाढत चालली आहे त्यामुळे ह्या व्यवसायातून लाभार्थी हा कमी कालावधीमध्ये खूप मोठा आर्थिक नफा कमवू शकतो.


मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी शासन कर्ज देत आहे आणि त्या कर्जावर अनुदानही देत आहे. परंतु शासनाचे कर्ज घेण्यासाठी अथवा अनुदान घेण्यासाठी प्रशिक्षणाची अथवा प्रशिक्षण पत्राची आवश्यकता या योजनेसाठी आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या हक्काची जर जमीन असेल अथवा तुमची दहा-पंधरा गुंठे जरी असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे व्यवसाय करू शकता.


मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा या योजनेचा लाभ घेणे साठी तुम्ही तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा तर सेवा केंद्र येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकता.


अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या

पशु विभागाकडे अथवा मत्स्य विभाग येथे जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता.


मत्स्य पालन व्यवसाय योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

सातबारा उतारा व आठ अ

उत्पन्नाचा दाखला

जात प्रमाणपत्र

प्रशिक्षण पत्र

बँक पासबुक

अर्जदाराचा फोटो

एवढ्या कागदपत्रांची या योजनेसाठी आवश्यकता आहे .

मत्स्य पालन मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला योग्य प्रशिक्षण असणे आवश्यक आहे तरच हा व्यवसाय करावा अन्यथा ज्ञान किंवा अनुभव नसेल तर या व्यवसायात उतरू नये याची देखील नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी.


धन्यवाद.


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

महात्मा फुले जन आरोग्य योजना