पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

 पोल्ट्री कर्ज योजना

पोल्ट्री फार्म कर्ज योजना

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50% सबसिडी

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये पोल्ट्री फार्म कर्ज योजनेची आवश्यक असणारी संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.

केंद्र सरकार नेहमीच बेरोजगारांसाठी वेगवेगळे योजना राबवत असते एक योजना म्हणजे पोल्ट्री फार्म अनुदान योजना होय.

केंद्र सरकार पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर अनुदान देणार आहे यासाठी सरकार एक खास योजना राबवत आहे. ग्रामीण भागात पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी सरकार लाभार्थ्याला 50% सबसिडी देणार आहे .

पोल्ट्री फार्म व्यवसाय योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

ग्रामीण भागात पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत कर्ज हे सरकार देणार आहे व या कर्जावरती लाभार्थ्याला 50% सबसिडी मिळणार आहे म्हणजे लाभार्थ्यांनी जर 50 लाख रुपये कर्ज घेतले तर लाभार्थ्याला फक्त 25 लाख रुपये परत करावे लागणार आहे .


पोल्ट्री फार्म व्यवसाय करण्यासाठी खालील लाभार्थ्यांना कर्ज मिळणार आहे.

शेतकरी

बचत गट

उद्योजक

सहकारी संस्था

शेतकरी उत्पादक संस्था.


पोल्ट्री फार्म व्यवसाय योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे देण्यात आलेल्या आहे.

पोल्ट्री फार्म व्यवसाय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला कमीत कमी एक एकर शेत जमीन असणे बंधनकारक आहे .

जर लाभार्थ्याची स्वतःची जमीन नसेल तर तो भाडेतत्त्वावर देखील जमिनीवरही कर्ज घेता येते परंतु हे कर्ज लाभार्थी व जमीन मालक दोघांच्या नावेंनी दिली जाणार आहे याची देखील नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी.


पोल्ट्री फार्म व्यवसाय योजनेसाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँका कर्ज उपलब्ध करून देईल.

पोल्ट्री फार्म योजने साठी कर्ज घेण्या अगोदर एक सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो पोल्ट्री फार्म ची योजना काय आहे त्यात नमूद करावे लागते व ऑनलाइन तो फॉर्म पोर्टलवर अपलोड करावा लागतो.

पडताळणी दरम्यान ती माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर तो अर्ज रद्द होऊ शकतो . या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असल्यास तुमचा सिबिल स्कोर चांगला असणं आवश्यक आहे जर सिबिल स्कोर चांगला नसेल तर बँक आपल्याला कर्ज देणार नाही.

कुक्कुटपालन व्यवसाय हा जोखमीच असल्याकारणाने या व्यवसायात उतरताना प्रशिक्षण असणं अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रशिक्षण पत्र ची देखील आपल्याला गरज लागणार आहे.


पोल्ट्री फार्म व्यवसाय योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

रहिवासी दाखला

जात प्रमाणपत्र असल्यास

पोल्ट्री फार्म प्रकल्प अहवाल

पोल्ट्री फार्म उभा करायचा आहे त्या ठिकाणचा एक फोटो

सातबारा उतारा व आठ अ

कौशल्य प्रमाणपत्र

एवढ्या सर्व कागदपत्रांची करायला आवश्यकता आहे.

धन्यवाद .Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

महात्मा फुले जन आरोग्य योजना

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna