दूध व्यवसाय योजना / नाबार्ड दूध व्यवसाय योजना

 दूध व्यवसाय योजना

नाबार्ड दूध व्यवसाय योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखांमध्ये नाबार्ड दूध व्यवसाय योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.

भारत देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे नाबार्ड दूध व्यवसाय योजना होय .

नाबार्ड दूध व्यवसाय योजनेअंतर्गत भारत देशातील ग्रामीण भागातील लोकांना दूध व्यवसाय करण्यासाठी भारत सरकारकडून कमी व्याज दारावर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड दूध व्यवसाय योजनेची अंमलबजावणी झाली .

नाबार्ड दूध व्यवसाय योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागातर्फे भारत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये दूध डेऱ्या उभारण्यासाठी मोठे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना केले जाणार आहे .

नाबार्ड दूध व्यवसाय योजना अंतर्गत ग्रामीण भागातील असंख्य बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे बेरोजगार सहजपणे त्यांचा व्यवसाय करू शकतील व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे या गोष्टी लक्षात घेऊनच सरकारने ग्रामीण भागामध्ये नाबार्ड दूध व्यवसाय योजनेची अंमलबजावणी केली आहे.

नाबार्ड दूध व्यवसाय योजनेमुळे देशांमध्ये दूध उत्पादनासाठी डेरी फार्म च्या स्थापनेला मोठी चालना मिळणार आहे व दूध उत्पादनापासून अनेक पदार्थ तयार केले जातात त्यामुळे  दूध उत्पादनापासून आधारित असलेल्या उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.

ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेतकरी शेतीबरोबरच प्रामुख्याने दूध उत्पादनाचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाते त्यामुळे देशातील अनेक बेरोजगारांना डेरी फार्म च्या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे व त्यासाठी लागणारे भांडवल नाबार्डच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे .


नाबार्ड दूध व्यवसाय योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे .

नाबार्ड योजनेअंतर्गत अर्जदाराला नाबार्ड बँकेकडून डेअरी व्यवसायासाठी सात लाखापर्यंत कर्ज मिळू शकते .

लाभार्थ्यांनी घेतलेल्या कर्जावर 33 टक्के अनुदान मिळणार आहे.

लाभार्थी कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 10 जनावरे खरेदी करू शकतात.

या योजनेसाठी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाकडून निधी दिला जातो .

लाभार्थ्याकडे जनावरांच्या चाऱ्याची तरतूद करण्यासाठी जमीन असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे वय हे 18 ते 65 वर्ष वयोगटातील असणे बंधनकारक आहे.


नाबार्ड योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

सामान्य शेतकरी

संघटित क्षेत्रातील गट आणि असंघटित क्षेत्रातील गट

डेरी सहकारी संस्था

बचत गट

दूध उत्पादक संघटना

पंचायती राज संस्था


पण योजनेअंतर्गत जर डेरी फार्म उघडायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात भेट द्यावी लागेल.

अर्जदाराच्या कर्जाची रक्कम मोठी असल्यास सर्वप्रथम त्या व्यक्तीला त्याचा प्रकल्प अहवाल नाबार्ड मध्ये⁷ सादर करावा लागेल.

लाभार्थ्यांनी कर्ज घेण्यासाठी जवळच्या सहकारी , प्रादेशिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकेत जावे व तिथे असणारे आवश्यक सर्व कागदपत्रे जमा करावीत.....

धन्यवाद


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna