मधमाशी पालन योजना

 मधमाशी पालन योजना अनुदान 

मधमाशी पालन योजना 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण मधुमक्षिका पालन योजना 2023 ची सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत. मधमाशी पालन योजनेची उद्दिष्टे काय, या योजने अंतर्गत लाभ काय मिळणार , या योजनेची अटी शर्ती व लाभार्थीची पात्रता व अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

 नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत मधमाशी पालन योजना .

शेतकरी हा शेती करत असताना पारंपरिक पद्धतीने शेती करत असतो व त्यामुळे शेतकऱ्याला नेहमीच आर्थिक उत्पन्नापासून वंचित राहावे लागते व त्याचबरोबर हवामान बदलाचा परिणाम देखील शेतीवर होताना दिसतो व गेल्या काही काही वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा देखील सामना करावा लागत आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते त्यामुळे शेती करणे जिकरीचे झालेले आहे. म्हणून सरकारने शेतीबरोबर शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावा या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबवले आहे त्यातीलच एक योजना म्हणजे मधुमक्षिका पालन योजना होय.

मधमाशांचे पालन जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणारा मध जर बाजारात जाऊन विकला तर शेतकऱ्याला कमीत कमी एक एकरी वार्षिक 60,000 ते 70,000 रुपयांचे उत्पादन मिळू शकते. मध् हे शारीरिक दृष्ट्या मनुष्याच्या खूप उपयोगाच्या असून बाजारामध्ये मधाला खूप मोठी मागणी आहे तसेच मधमाशांच्या मेणापासून सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे दिवसेंदिवस  मधा ला खूप मोठी मागणी जागतिक स्तरावरून होताना दिसत आहे.


# मधमाशी पालन योजनेचे उद्दिष्टे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

मधमाशी पालन योजनेमुळे भूमिहीन अथवा अत्यल्प जमीन असलेल्या किंवा जिरायती जमिनीवरती व्यवसाय करून शेतकरी हा आर्थिक उत्पादन वाढू शकतो.

ग्रामीण भागामध्ये मधमाशी पालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्याने आपले आर्थिक उत्पन्न वाढवणे.

ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना मधमाशी पालन योजनेमुळे रोजगार उत्पन्न हाय या योजनेच्या मुख्य उद्दिष्ट आहेत.


# मधमाशी पालन योजनेसाठी लाभार्थी निवड व त्याची पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

मधमाशी पालन योजना अंतर्गत कृषी विभागाने लाभार्थ्याची निवड ही भूमिहीन शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती व महिला यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे .


# मधमाशी पालन योजनेसाठी किती अर्थ साहाय्य मिळते ते खालील प्रमाणे.

मधमाशी पालन योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला जास्तीत जास्त 50 मधमाशी संच , 50 मधमाशी पेटी व मत काढायचे यंत्र यासाठी अनुदान मिळते जर यापेक्षा कमी खरेदी केली तर त्याचा अनुदानाचा लाभ ध्येय ठरलेला आहे .


# मधमाशी पालन योजनेसाठी लाभ कोठे करावयाचा आहे ते खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे .

मधमाशी पालन योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावयाची आहे व आवश्यक ती कागदपत्रे सादर करावयाची आहेत .

कृषी विभागातर्फे लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर तशी माहिती लाभार्थ्याला एसएमएस द्वारे अथवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यातर्फे कळते.

आपली निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत सर्व मधमाशी संचाची खरेदी करून तसेच सर्व कागदपत्रे , बिले ऑनलाइन पद्धतीने सादर करायची आहे व त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्याला अनुदान मिळणार आहे .


# मधमाशी पालन योजनेसाठी कोणत्या कोणत्या अटी व शर्ती आहेत त्या खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत.

कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते .

मधमाशी पालन योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था या शेतकऱ्यांनी स्वतः करावयाच्या आहेत .

शेतकऱ्याने मधमाशीपालन हा व्यवसाय कमीत कमी तीन वर्षे तरी करणे बंधनकारक राहील.

मधमाशी पालन योजनेसाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलेली असावी ..

मधमाशी पालन योजनेची अधिक माहिती हवी असल्यास आपल्या जवळच्या कृषी विभागाला भेट देऊन कृषी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घ्यावी........ धन्यवाद

अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या..

धन्यवाद.
Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

महात्मा फुले जन आरोग्य योजना

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna