शिलाई मशीन योजना / आता सरकार देणार फ्रीमध्ये शिलाई मशीन shilai mashin yojna
शिलाई मशीन योजना 2023
Shilai mashin yojna
फ्री शिलाई मशीन योजना
नमस्कार मित्रांनो
आज आपण या लेखामध्ये फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे , लाभार्थ्याची वय , निकष व पात्रता याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.
भारत देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्याकारणाने महिला चूल आणि मुल या व्यवस्थेमध्ये पूर्ण अडकून गेलेली आहे आणि सध्या महागाईच्या काळामध्ये पुरुषाच्या उत्पन्नातून घराचा आर्थिक खर्च करणे खूप जिकरीचे झाले आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून घरबसल्या काहीतरी काम करता यावे व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवता यावी यासाठी भारत सरकारने महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत शिलाई मशीन देण्याचे ठरवले आहे.
शिलाई मशीन मिळवण्यासाठी महिलांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे त्यासाठी आवश्यक असणारी माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण अथवा शहरी भागातील सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक , रोजंदारीने काम करणाऱ्या महिला , ओबीसी महिला , विधवा महिला ,गरीब महिला यांची वार्षिक उत्पन्न 40000 च्या खाली आहे अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय हे 20 ते 40 या वयोगटातील असावे लागते.
अर्ज करत असताना जर आपण चुकीची माहिती भरली तर तो अर्ज बाद होऊ शकतो.
अर्जदार हा महाराष्ट्रातील नसला तरीदेखील त्याचा अर्ज बाद होऊ शकतो.
शिलाई मशीन योजनेसाठी लाभार्थी महिलेकडे शिलाई मशीन काम प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
विधवा महिला असेल अथवा अपंग महिला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळू शकतो.
विधवा महिलेला पतीचे मृत्यूचा दाखला देणे गरजेचे आहे तर अपंग महिलेला तिचे अपंगत्व प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक गरजू महिला आपले आर्थिक उत्पन्न वाढवून कुटुंबाला मोठा आधार देणार आहे .
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
मोबाईल नंबर
पतीचा मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला
अपंग प्रमाणपत्र असल्यास
जातीचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
ग्रामपंचायत ठराव
एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
अर्जदाराने अर्ज ऑनलाइन पद्धतीने आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार केंद्र येथे जाऊन सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती भरावा.
अर्जदार शिलाई मशीन योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने सुद्धा
देखील सादर करू शकतो त्यासाठी त्याने संपूर्ण अर्ज व त्याची आवश्यक असणारी कागदपत्रे ही आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती येथे जमा करावी त्यानंतर त्या सर्व कागदपत्रांची संबंधित अधिकारी पडताळणी करतो लॉटरी पद्धतीने त्या लाभार्थ्याचे नाव निघाली तर त्याला शिलाई मशीन देण्यात येते.
आपण अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाला अवश्य भेट द्यावी.
धन्यवाद.
अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक ला अवश्य भेट द्या.
http://www.newsjunner.com
Comments
Post a Comment