पिठाची गिरणी योजना आता सरकार देणार महिलांना 100% अनुदान पिठाची गिरणी

 पिठाची गिरणी योजना pithachi giran yojna 2023

घरगुती पिठाची गिरण योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखांमध्ये घरगुती पिठाची गिरणी योजनेसाठी

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्या संदर्भात असणारी सर्व निकष याची आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्य सरकार हे नेहमीच महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत व्हावी व महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हाव्या यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यापैकी पिठाची गिरणी योजना ही एक आहे.

महाराष्ट्र राज्यातील शहरातल्या अथवा ग्रामीण भागातल्या आर्थिक दुर्बल गटकांमधील सर्व स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतात.

ग्रामीण भागातील अथवा शहरी भागातील सर्व स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊन रोजगार उपलब्ध करू शकतात त्यासाठीच राज्य शासनाने ही योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब गरजू महिला स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात.

पिठाची गिरणी योजनेसाठी महिला या आर्थिक दुर्बल घटकांमधील , अनुसूचित जाती जमाती मधील, गरीब महिला, रोजंदारीने काम करणारे महिला, अपंगत्व आलेल्या महिला, विधवा महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या दृष्टीने पात्र आहेत.

पिठाची गिरण योजनेच्या माध्यमातून एकदा की गिरण मिळाली की महिला घरगुती स्वतःचा लघुउद्योग करू शकतात अथवा व्यवसाय करू शकतात.

पिठाची गिरणी योजनेसाठी राज्य सरकार हे महिलांना प्राधान्य देत असल्याकारणाने शंभर टक्के अनुदान देत आहे त्यामुळे या योजनेचा लाभ सर्व पात्र असलेल्या महिलांनी जरूर घ्यावा.

पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही 18 ते 60 वयोगटातील असावी.

पिठाची गिरण योजनेचा लाभ हा प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अथवा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती ना कळवण्यात येते व पंचायत समितीतर्फे ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामसेवकांना कळविण्यात येते .

लाभार्थी अर्जदाराने जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अथवा पंचायत समिती कार्यालय मध्ये अवश्य भेट द्यावी .

पिठाची गिरण योजना चालू असेल तर तेथून ह्या योजनेचा फॉर्म घ्यावा व त्या फॉर्म मधील असलेली सर्व अचूक माहिती व त्या संदर्भात असलेली कागदपत्रे पंचायत समिती येथे जमा करावी. जमा करत असताना आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचा ग्रामसभेचा अथवा मासिक सभेचा ठराव जोडणे बंधनकारक आहे.

अर्जदाराने जमा केलेल्या फॉर्म ची निवड पंचायत समितीमध्ये लॉटरी पद्धतीने केली जाते जर लाभार्थ्याचा अर्ज त्या निवडीमध्ये पात्र ठरला तर संबंधित अधिकारी तशी सूचना आपल्या मोबाईल नंबर वर पाठवते याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

मोबाईल नंबर आधारशि लिंक असलेला

अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र

अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास

विधवा असल्यास पतीचा मृत्यूचा दाखला

उत्पन्नाचा दाखला

दहावी किंवा बारावी पास असल्याचा दाखला

ग्रामसभेचा अथवा मासिक सभेचा ठराव

एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यामुळे अर्जदाराने संपूर्ण माहिती अचूक भरून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.

धन्यवाद .

अशा अनेक सरकारी योजनेची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या.

http://www.newsjunner.com



Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna